कोहली, पड्डीकल यांची अर्धशतके   

बंगळुरु : आयपीएल २०२५ च्या ४२ व्या सामन्यात गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्तान रॉयल्स आमनेसामने होते. एम चिन्नास्वामी मैदानावर खेळल्या जाणार्‍या या सामन्यात राजस्तान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बंगळुरुने २० षटकांत २०५ धावा केल्या. त्यामुळे राजस्तानच्या संघाला २०६ धावांचे आव्हान मिळाले.या वेळी बंगळुरुचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने ४२ चेंडूत ७० धावा केल्या. आणि जबरदस्त अर्धशतक साकारले. कोहली याला जोफ्रा आर्चर याने शानदार गोलंदाजी करत नितीश राणाकडे झेलबाद केले. 
 
त्याआधी सलामीवीर फिल सॉल्ट हा २६ धावा करून बाद झाला. वानिंदू हसरंगा याने हॅटमायरकडे त्याला झेलबाद केले. देवदत्त पडीक्कल याने ५० धावा केल्या. त्याने बंगळुरुच्या संघासाठी दुसरे अर्धशतक केले. टिम डेविड याने २३ धावा केल्या. मात्र तो धाव घेताना बाद झाला. रजत पाटीदार हा अवघ्या १ धावेवर बाद झाला. संदीप शर्मा याने शानदार गोलंदाजी करत ध्रुव ज्युरेल याच्याकडे झेलबाद केले. त्यानंतर जितेश शर्मा हा २० धावांवर नाबाद राहिला. तर १५ अवांतर धावा बंगळुरुला मिळाल्या. 
 
 या हंगामात चिन्नास्वामीवर आरसीबीला एकही विजय मिळालेला नाही. रजत पाटीदारच्या संघाने या हंगामात घरच्या मैदानावर ३ सामने खेळले आहेत आणि तिन्हीही सामने गमावले आहेत. यापूर्वी, जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा आरसीबीने विजय मिळवला होता. आता राजस्तानला बदला घ्यायचा असेल. 
 
पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू घरच्या मैदानावर नाणेफेक हरली. बंगळुरूमध्ये सलग चौथ्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक गमावली आहे. राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघात एक बदल करण्यात आला आहे आणि महिश तीक्षनाऐवजी फजलहक फारुकीला संघात स्थान देण्यात आले आहे. बंगळुरू संघात कोणताही बदल नाही.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची प्लेइंग-११ : फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड, यश दयाल. इम्पॅक्ट प्लेयर : सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग.
 
राजस्थान रॉयल्स संघाची प्लेइंग-११ : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, फजलहक फारुकी, तुषार देशपांडे, संदीप शर्मा.
 
इम्पॅक्ट प्लेयर : वैभव सूर्यवंशी, युधवीर सिंग चरक, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, कुणाल सिंग राठौर.
आतापर्यंत आरसीबीने आयपीएल २०२५ मध्ये ५ सामने खेळले आहेत. या काळात संघाने पाच सामने जिंकले आहेत.
 

Related Articles